अंबाजोगाईत मनस्विनी प्रकल्पाचा उपक्रम
अंबाजोगाई । वार्ताहर
येथील मानवलोक अंतर्गत मनस्विनी महिला प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांसह बचत गटाच्या महिलांनी 5 हजार मास्कची निर्मिती झाली व त्याची विक्रीही केली. स्वच्छता कामगार, पोलीस व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत मास्कचे वितरण मनस्विनीने केले. लॉकडाऊनमध्येही या उपक्रमामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
येथील मानवलोक सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक पातळ्यांवर काम सुरूच आहे. मानवलोकने स्वा.रा.ती. रूग्णालयास एक हजार एन -15 मास्क उपलब्ध करून दिले.मानवलोक अंतर्गत कार्यरत मनस्विनी महिला प्रकल्पानेही कार्यकर्त्या व इतर बचत गटांच्या माध्यमातून कापडी मास्कची निर्मती सुरू केली आहे. बाजारात मास्कचा तुटवडा असताना शहरवासियांना अत्यावश्यक मास्क मनस्विनीने मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले. बचतगटाच्या महिलांनी कापड, इलास्टीक व शिलाई मशीनच्या माध्यमातून मास्कनिर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली.प्रारंभीच्या काळात तयार केलेले मास्क शहरातील विविध सामाजिक संस्था व उपेक्षितांना वाटप करण्यात आले. मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने दररोज आठ ते नऊ तास बसून महिला मास्कचे उत्पादन करीत आहेत.आजपर्यंत पाच हजार मास्कची निर्मिती करून विक्री करण्यात आली आहे. या विक्रीतून होणारा नफाही सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.
Leave a comment