गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील सर्व रेशन दुकानदांरानी भावफलकाचा बोर्ड लावूनच धान्य वाटप करण्याची सूचना आ लक्ष्मण पवार यांनी तहसील प्रशासनाला केली असून, महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचार्यांसह, नगरसेवक व सरपंचानी आपली जबाबदारी पार पाडवी असे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
कोरोनो नावांच्या विषाणूचा सामना करावा लागत असून, या परिस्थितीत अनेक गोरगरिब कुटूंबाना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याने, देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन महिने मोफत तांदूळ उपलब्ध करून देऊन अनेक गोरगरिब कुटूंबाना आधार दिला आहे. गेल्या महिन्यात वाटप झालेल्या धान्य वितरणात कार्डंधारकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे मे महिन्यात होणा-या धान्य.वाटपात कोणीही गरीब रेशन पासून वंचित रहावू देऊ नका तसेच प्रत्येक स्वस्तधान्य दुकानदांरानी शासनाने दिलेल्या धान्यांची माहीती त्यांचे शासकीय दर बोर्डावर देऊन प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्याला किती धान्य आले यांची माहिती होण्यासाठी रेशन दुकानात बोर्ड लावूनच धान्य वितरण करावे असे आवाहन आ. पवार यांनी प्रसिद्धी पञकात केले आहे. गेवराई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी एप्रिल महिन्यात तांदळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आसल्याचे समोर आले आहे. तेव्हा मे महिन्यात होणा-या स्वस्तधान्य वितरणात अन्नसुरक्षा,अंत्योदय, बी.पी.एल. व ए.पी.एल.शेतकरी व केशरी रेशनकार्डधारकांना विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यीना रेशनचे वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. प्रत्येक लाभार्थ्यीला त्यांच्या हक्काचे रेशन देण्यासाठी प्रत्येक रेशन दुकानदारांनी आपआपल्या स्वस्तधान्य दुकानात बोर्ड लावूनच धान्य वाटप करावे अशा सुचना आ. पवार यांनी केली असून, सर्व गोरगरिबांना केशरी रेशनकार्डच्या माध्यमातून 8 रू किलो गहू व 12 रू किलो तांदुळ प्रति व्यक्ती 5 किलो , या पध्दतीने धान्य पुरवठा करण्याचे ठरवले आहे. केशरी रेशनकार्ड धारकांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक रेशन दुकानादारांनी नियोजन करून लॉकडाऊनचे नियम पाळून सोशल डिस्टीगीचा अवलंब करून प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्याला स्वस्तधान्य वाटप करावे असे आवाहन ही आ. पवार यांनी केले आहे. रेशनचा काळाबाजार होऊ नये म्हणून नियुक्ती आधिकारी यांनी स्वतःहा लक्ष देऊन काम करावे नसता रेशन दुकानदारा सोबतच आधिका-यांना सुध्दा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. गेवराई मतदार संघातील प्रत्येक रेशन दुकानादारांनी नियोजन करून अन्नसुरक्षा व अंत्योदय बि.पि.एल तसेच ऐ.पि.एल.शेतकरी व केशरी रेशन कार्डधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या भावांतच धान्य वितरण करावे तसेच प्रत्येक सरपंच नगरसेवक यांनी आपआपल्या भागातील रेशनकार्ड धारकांना धान्य वितरणात कसलीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक लाभार्थ्यीला रेशन मिळावे. रेशन वितरणात भ्रष्टाचार होऊ नये याची काळजी प्रत्येक वार्डातील नगरसेवक व गावातील सरपंचानी घ्यावी असे आवहान आ. पवार यांनी केले आहे.
Leave a comment