70 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या केल्या तपासण्या
गेवराई । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असून या काळात त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आनेकाचा संपर्क येत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये व सर्वांचे आरोग्य सुद्रुढ रहावे यासाठी गेवराई डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आज गेवराई पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सपोनि संदीप काळे, राजाराम तडवी,पो.उपनिरीक्षक युवराज टाकसाळ,मनीषा जोगदंड,एएसआय ऐटवार,पो.ना.शरद बहिरवाळ, नारायण खटाने, संतोष गाडे, विशाल प्रधान, अमोल खटाने, पत्रकार सखाराम शिंदे, भागवत जाधव यांची उपस्थिती होती. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्ताच्या सर्व तपासण्या, ईसीजी, नेत्र तपासणी, यासह सर्व तपासा करण्यात आल्या यामध्ये एकूण 70 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. या तपासणीनंतर डॉ.विशाल पवार प्रधानमंत्री जण औषधी केंद्राचे संचालक गंगाराम पवार यांच्या वतीन सर्व मेडिकल मोफत देण्यात आले. चेक पोस्ट वर असलेल्या कर्मचार्यांसाठी त्याठिकाणी जाऊन तपासण्या केल्या असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीने डॉ.आबेद जमादार यांनी दिली. तर यानंतर महसूल प्रशासन,पत्रकार व न.प.चे सफाई कामगार यांच्यासाठीही या मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ.बी.आर.मोटे यांनी सांगितले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गेवराई तालुका डॉक्टर्स आसोशिएशनचे डॉ.सर्वोत्तम शिंदे, डॉ.बी.आर.मोटे (संचालक आधार हॉस्पीटल),डॉ.आबेद जमादार (सदस्य बीड जिल्हा आरोग्य समिती),डॉ.धनंजय माने (मधुमेह तज्ञ ),ओमप्रकाश भुतडा (बालरोग तज्ञ),डॉ.प्रदीप राठोड (स्त्रीरोग तज्ञ),डॉ.किसन देशमुख (नेत्ररोग तज्ञ), डॉ.राम दातार,डॉ.दामोधर कुटे, डॉ.मनोज मडकर, डॉ.मृणालिनी मडकर, डॉ.तानजी पाटील,डॉ.विशाल पवार,डॉ.जीवन राठोड,डॉ.आभीजीत येवले,डॉ.गणेश राऊत,डॉ.गुलाब गाडे यांच्यासह गेवराई तालुका डॉक्टर्स आसोशिएशन सर्व सदस्य यांची उपस्थिती होती.
Leave a comment