नांदूरघाट । वार्ताहर
मूकबधिर व अंध विद्यार्थ्यांना किराणा व जीवनावश्यक वस्तूची वाटप सामाजिक कार्यकर्ते संतोष ढाकणे यांच्याकडून करण्यात येत आहे.
पुणे येथे मूकबधिर शाळेमध्ये मराठवाड्यातील विद्यार्थी आहेत परंतु या लॉकडाऊनमुळे शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या. होत्या त्यानंतर ते आपापल्या गावी गेले या शाळेतील शिक्षक लामतुरे यांनी संतोष ढाकणे यांना फोन करुन मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संतोष ढाकणे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन हजार रुपयाची किट मदत देणे चालू केले आहे. बीड, परभणी, जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची त्यांना लिस्ट दिली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेमेंटद्वारे प्रत्येकी दोन हजार रुपयाची मदत केल्याचे संतोष ढाकणे यांनी सांगितले. त्यांच्या या कार्याचे कौतुक होताना दिसते आहे.
Leave a comment