गावपातळीवर आरोग्य तपासणी, सर्व्हेक्षणाचे काम
बीड । सुशील देशमुख
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात व शहरात आशा स्वयंसेविकामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. हा सर्वे बीड जिल्ह्यात नियमित सुरु आहे. त्यामध्ये बाहेर देशातून 118 तर बाहेर जिल्हयातून आलेले नागरिक आलेले आहेत. सर्वांना घरात राहण्याबाबत सल्ला देण्यात आलेला आहे, त्यापैकी काही नागरिकांना लक्षणाबाबत नियमित सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. असे असले तरी आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्व ठिकाणी सर्वेक्षण करणे जिकिरीचे ठरत आहे. तरीही आवश्यकता असेल त्या परिसरात तपासणी केली जात आहे.
बीड जिल्हयामध्ये आजपर्यंत कोरोनाचा रुग्ण नाही. एक रुग्ण बीड जिल्हयातील रहिवासी अहमदनगरला उपचार घेत होता तो कोरोनामूक्त होवून घरी परतला आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 1 लाख 94 हजार 415 नागरिक दाखल झाले आहेत. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करतानाच नोंद ठेवण्यात आली आहे. यात अंबाजोगाई-12,261, आष्टी-26,859, बीड-35,525, धारुर- 11,537, गेवराई - 20,146, केज - 17,269, माजलगाव-11,009, परळी- 12,542,पाटोदा -18,666, शिरुर - 20,168 आणि वडवणी तालुक्यातील 8,433 नागरिकांचा समावेश आहे. आरोग्य विभागामार्फत 14 चेकपोस्टवर 19 एप्रिल 2020 पासून बाहेर जिल्हयातून बीड जिल्ह्यात येणार्या प्रत्येक नागरिकांची नोंद व तपासणी घेतली जात आहे. आजपर्यंत 74 हजार 66 लोकांच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये कोणाला लक्षणे असल्यास उपचार देण्यात आलेली आहे.ऊसतोड मजूरांसाठी चेकपोस्ट व गावामध्ये तपासणी केली जात आहे. या तपासणीसाठी 20 चेकपोस्ट तयार करण्यात आलेल्या असून येणाच्या प्रत्येक कामगारांची थर्ज्ञल स्क्रीनिंग व तपासणी करण्यात येत आहे, तसेच गावामध्ये त्यांना 28 दिवसाकरीता होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.
आजपर्यंत 33 हजार 411 मजूरांची तपासणी करण्यात आलेली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचे कोविड-19 बाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे, त्याची तांत्रिक क्षमता बळकट करण्यात आली आहे.संशयातीत रुग्ण आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी व पोलीस निरिक्षक यांचे पथक तयार करण्यात ओलेले असून सदर पथक संशयीत रुग्णालयामागील 14 दिवसाच्या संपर्कीत आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचा अहवाल येईपर्यंत होम क्वॉरंटाईन करण्यात येते. गावपातळीवर सर्वेमध्ये लक्षणे आढळलेल्या नागरिकांची तपासणी व थर्मल स्क्रीनिंग डॉक्टरांच्या विशेष तपासणी पथकामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशी 440 विशेष पथके कार्यान्वीत आहेत.
तीन हजाराहून अधिक कोरोना वॉरियर्सची टिम सज्ज
कोरोना विरोधात लढण्याकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी, अधिनियम मनुष्यबळ काम करत आहे. तालुका आरोग्य अधिकारी -11, वैद्यकीय अधिकारी- 133, समुदाय आरोग्य अधिकारी-151, औषध निर्माण अधिकारी-52, विस्तार अधिकारी, आरोग्य- 13, स्वयंसेविका- 1926, आरोग्य सेवक (पुरुष)- 239, आरोग्यसेविका, आशा स्त्री (नियमित 248 व कंत्राटी 167), आरोग्य सहाय्यक - 103 , एल.एच.व्ही. (नियमित 51 व कंत्राटी 28), स्टाफ नर्स- 22, गटप्रवर्तक- 96, समुह संघटक- 10 व राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असणारे जिल्हास्तरावरील कर्मचारी -13 असे एकूण 3 हजार 263 अधिकारी व कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत.
24 तास नियंत्रण कक्ष
जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. राधाकिशन पवार, साथरोग वैद्यकीय अधिकारी, डॉ.पि.के.पिंगळे, वैद्यकीय अधिकारी (कुष्ठरोग),डॉ.सतिष शिंदे व 13 तांत्रिक कर्मचारी या नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. यामध्ये बिलगीकरण कक्षात दाखल झालेल्या रुग्णांचे कॉन्टॅक्ट शोधणे, संशयित कोविड-19 प्रवासी शोधणे, विविध विभागातून आलेल्या प्रवाशांच्या माहितीची खात्री मोबाईलद्वारे करुन त्यांना सर्दी,ताप,खोकला,श्वास घेण्यास त्रास इ लक्षणे आहेत का? अशा प्रवाशांनी बैद्यकीय उपचार घेतला का, गरज असेल तर अशा प्रवाशांना-नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याच्या संदर्भात संबंधित तालूका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ. केंद्र यांच्याशी संपर्क साधून कार्यवाहीची पुर्तता, आदी सर्व उपाययोजना करत कोविड-19 चा प्रसार रोखण्याकरीता प्रभावीपणे कार्यवाही करण्यात येत आहे.
तंत्रज्ञानाचाचा प्रभावी वापर
प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत माहितीचे संकलन,अॅनालिसिस व माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरीता तंत्रज्ञानाचा बापर करुन प्रभावीपणे काम सुरु आहे.इझी अॅपमध्ये चेकपोस्ट, गावपातळीवर,सर्व खाजगी,शासकीय दवाखाने, औपधी दुकानातून संशयीत लोकांची व बाहेर गावातून आलेल्या नागरीकांची माहिती भरली जाते. आजपर्यंत 1 लाख 20 हजार 515 जणांची माहिती भरण्यात आलेली आहे. या अॅपमधील माहितीचे विश्लेषण करुन योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय आरोग्य सेतू अॅप सर्व नागरिकांना इन्स्ट्राल करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.तसेच जिल्हास्तरावरुन देखील सर्व अधिकारी व कर्मचार्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा नियमित घेण्यात येत आहे.
इतर विभागाशी समन्वय
आरोग्य विभागाकडून पोलीस, महसूल, जिल्हा परिषद व राज्यशासनाच्या सर्व विभागाशी समन्वय ठेवून त्यांची मदत धेण्यात येत आहे. सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाशी निगडीत आहेत. प्रतिबंधात्मक उपायोजना प्रभावी राबविल्यामुळे उपचार करण्याचा रुग्णालयाचा ताण कमी होऊन मनुष्यबळ, औपधीसाठी त्यांची बचत झालेली आहे.
Leave a comment