व सफाई कामगारांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार
किल्लेधारुर युथ क्लबचा अनोखा उपक्रम
किल्लेधारूर । वार्ताहर
दि.2 मे शनिवार रोजी सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या किल्ले धारूर युथ क्लबच्या वतीने कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये महत्वाची भुमिका बजावणार्या पोलिस, आरोग्य, विज मंडळ व स्वच्छता कर्मचार्यांसह पत्रकारांना गुलाब पुष्पदेवून सत्कार करण्याचा अनोखा उपक्रम राबवला.
किल्लेधारूर युथ क्लब नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहेत. यामध्ये मास्क वाटप, गोरगरीब व्यक्तींना किराणा वाटप, तसेच मजुरांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना भाडे माफी मिळावी तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणार्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर त्यांचे थकीत पगार करण्यात यावे यासाठी वेळोवेळी निवेदन दिले. किल्ले धारूर युथ क्लब या संस्थेने सत्कार करताना अनेक व्यक्ती घरात बसून असताना काही व्यक्ती आजही आपापल्या क्षेत्रावर काम करत आहेत. कोरोना शी लढत असणारे डॉक्टर्स, नगरपालिका सफाई कामगार, वीज वितरण कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि या सर्वांना प्रसिद्धी देण्यासाठी पत्रकार बंधु हे सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता वेळी आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक नागरिक कोरोना पासून कसे दूर राहील याची दक्षता घेतात व प्रसंगी त्यांना वेळेवर जेवायला मिळत नाही. त्यांना वेळेवर झोपायला मिळत नाही त्यांचा आराम हराम झाला आहे. अशा परिस्थितीतही अगदी मन लावून काम करत आहेत आणि त्यांच्या कार्याची कुठे ना कुठे दखल घेऊन त्यांचा ना फुलाची पाकळी देऊन सत्कार करावा या हेतूने किल्ले धारूर युथ क्लब चे सदस्य त्यांचा सत्कार करण्यासाठी आज पुढे आले. डॉक्टर, पाणीपुरवठा कामगारांचा, सफाई कामगार यांचा सत्कार केला. त्याचबरोबर आरोग्य कर्मचार्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर संपूर्ण व्यक्ती आज घरात असताना वीज किती महत्वाची आहे. घरामध्ये आज टीव्ही मोबाईल, कुलर, फॅन यांची किती आवश्यकता आहे ती बघून वीज वितरण कर्मचार्यांनी अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. पोलिस प्रशासन आणि पत्रकार बंधू अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सर्वाचा सत्कार किल्ले धारूर युथ क्लब च्या वतीने करण्यात आला. सत्कार करण्यासाठी किल्लेधारुर युथ क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते. यामध्ये सुरेश शिनगारे, सूर्यकांत जगताप, प्रा.नितीन शुक्ला, गौतमराव शेंडगे, धनुभाऊ भावठणकर रवि गायसमुद्रे, अनिल तिवारी, अशोक लोकरे, दत्ता गोरे, नाथा ढगे हे उपस्थित होते.
Leave a comment