माजलगाव । वार्ताहर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष विजयजी आंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील आढावा घेण्यासाठी राज्य कार्यकारिणीची डिजिटल मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या डिजिटल मीटिंग मध्ये प्रदेशाध्यक्ष विजय आंभोरे सह प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरखडे, जितेंद्र देहाडे सह सर्व प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष यांची उपस्थिती होती. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बीड जिल्हा आढावा देताना, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी सांगितले की सध्या तरी बीड मध्ये कोरोना 19 ची एकही केस नसून जिल्हा सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे. त्याचप्रमाणे जिल्हाभरात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी व अनु .जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार आणि काँग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा प्रभारी शिवाजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात अतिशय चांगल्या प्रकारे प्रसिद्धी न करता गरजू लोकांना मदत केली गेली असल्याचे माहिती देत जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
तसेच यावेळी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी सह त्यांच्या परीक्षास अडथळा आल्यास निकाल प्रलंबित राहून शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये याच्यासाठी पक्ष श्रेष्ठीने राज्य पातळीवर प्रयत्न करावेत तसेच कोरोना च्या या भीषण संकटाने सर्वांचेच हाल चालू असून अश्या काळात वेठबिगार, ऊसतोड कामगार, शेतमजूर यांसह इतर क्षेत्रातील मजूर हवालदिल झालेला असून त्यांना एप्रिल ते जुलै अश्या चार महिन्याचे किमान वेतन व सरसकट वीजबिल माफी मिळुन देऊन मजुरांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी विडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय आंभोरे सह पक्ष श्रेष्ठीकडे केली. यावेळी या लक्षवेधी मागणीचे प्रदेशकार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे व गौतम आरखडे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांचे अभिनंदन केले. तसेच या पुढेही आगामी लॉकडाऊनच्या काळात जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे स्थानिक प्रशासन व गरजू लोकांची मदत सातत्याने करतील असे काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे
Leave a comment