माजलगाव । वार्ताहर

देशात कोरोना विषाणू ने थैमान घातल्या मुळे गोरगरिबांचे हाल झाले म्हणून राज्यात दानशूरानी सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूना किराणा किट देत आहेत याच धर्तीवर माजलगाव तालुक्यातले बंडू घोडे यांनी कल्याण मुंबई मध्ये किराणा किट चे वाटप केले आहे. पुरोगामी विचार मंच, समता संघर्ष आणि संत रविदास प्ररबोधन मंडळ यांच्या संयुक्त पुढाकाराने दि.2 मे रोजी दुस-यांदा कल्याण शहरात गरजूंना जिवनावश्यक वस्तूंसह 100 शंभर किटचे वाटप करण्यात आले आहे.

तहसिलदार व खडकपाडा पो.स्टे.चे वरिष्ट पो.निरिक्षक यांच्या सहमतीने सोशल डिस्टन्स ठेऊन मोहना, म्हारळ, चिंचपाडा, मिलींदनगर, ईंदिरानगर, धा.शहाड. सिध्दार्थनगर, शिवकाँलनी, बिर्ला काँलेज, कोकण वसाहत, चिकनघर, पोर्णिमा ईत्यादी ठिकाणच्या सर्व गरजूना मदत करण्यासाठी पुढाकार घेवून मा.बंडू घोडे शैलैश दोंदे, मा.डाँ बी.एस वाघ, मा.अँड.दिलीप वाळंज, गणेश सोष्टे यांच्या सह यावेळी विश्‍वकांतजी लोकरे, भरत सगळगिळे, अविनाश मोहिते, रामकिशन तायडे, माणिक एडके, भोसीकर, दिपश्री बलखंडे- माने मँडम, वाधवा मिडोज तर्फे वैशाली भालेराव, किर्तिश वैरागडे, दीपा सरकारे, विशाखा पाटील, रुपाली मिसाल, रुपेश बेसेकर यांसारख्या काही समाज सेवक व सामाजिक संघटनांनी सहकार्य करून विशेष प्रयत्न केल्यामुळे गरजूना जिवनावश्यक वस्तूंसह शंभर (100)धान्यांच्या किटचे वाटप केले असून या मदती साठी शैलैश दोंदे, बंडु घोडे, डाँ बी.एस वाघ व अँड दिलीप वाळंज गणेश सोष्टे, कोंडीबा खंडागळे, संतोष सानावले यांनी नियोजन करून विशेष परिश्रम घेतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.