गेवराई । वार्ताहर
शहरातील दारिद्र्य रेषेखाली येणार्या बचत गटाचे बॅन्क खाते येथील हैदराबाद बॅन्केने होल्ड केले असून, थकबाकी भरा नसता कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तोंडी तंबी दिली आहे. दरम्यान, कोरोना सारख्या आजारामुळे रोजगार बंद असल्याने बचत गटाच्या महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असताना, बॅन्केने अडवणूकीचे धोरण सुरू ठेवले आहे. त्यामुळे, महिला बचत गटात नाराजी आहे. बिकट परिस्थितीत बॅन्केने अडवणूकीचे धोरण ठेवल्याने शहरातील पाचशे बचत गट लॉकडाऊन झाले आहेत.
शहरात दारिद्र्य रेषेखालील पाचशे बचत गट कार्यरत आहेत. कार्यरत असलेल्या आणि नियमात बसणार्या अशा अनेक बचत गटांना राष्ट्रीयकृत बॅन्केने लाख - दोन लाख रुपयांची कर्ज मंजूर करून वितरीत केले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोना सारख्या आजाराने सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले असून, हातातले रोजगार थांबले आहेत. त्यामुळे बचत गटाच्या महीलांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. बॅन्केचे कर्ज फेडण्यासाठी वेळेवर हप्ते देता येत नाहीत. मात्र, हैदराबाद बॅन्केने तगादा लावला असून, कर्ज घेतलेल्या बचत गटाचे खातेहोल्ड करून गटांचे व्यवहार बंद केले आहेत. पैशाची देव-घेव थांबली असल्याने बचत गटाच्या महिलांना आर्थिक अडचणी येऊ लागल्या आहेत. बॅन्क व्यवस्थापका कडेन सारखा तगादा लावला जात असून, अरेरावीची भाषा करून महिलांना अपमानित करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असून, बॅन्केने अडवणूकीचे धोरण सोडून बचत गटाच्या खात्याला लावलेल होल्ड हटविण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली आहे. शहरातील दारिद्र्य रेषेखाली येणार्या बचत गटाचे बॅन्क खाते होल्ड केल्याने अडचणीत आलेल्या गोरगरीब बचत गटाकडे पैसे नाहीत. मग हप्ते भरायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. थकबाकी भरा नसता कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तोंडी तंबी ही बॅन्केने दिली आहे. दरम्यान, कोरोना सारख्या आजारामुळे रोजगार बंद असल्याने बचत गटाच्या महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असताना, बॅन्केच्या आडमुठेपणा मुळे महिला बचत गटात नाराजी पसरली असून, बिकट परिस्थितीत बॅन्केने अडवणूकीचे धोरण ठेवल्याने शहरातील पाचशे बचत गट लॉकडाऊन झाले आहेत.
Leave a comment