ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भूषण पवार यांचा स्तुत्य उपक्रम
बीड । वार्ताहर
लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतीष्ठानचे सक्रिय कार्यकर्ते तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भुषणजी पवार यांनी गरजवंतांनची आडचण ओळखून जिथे कमी तिथे आम्ही या वाक्याला साजेश्या अश्या समर्पित भावनेतून स्वखर्चातून आंतरवन पिंपरी, तेलगांव नाका येथील पाला वरील वस्तीत, पिंप्री तांडा या ठिकाणी मा.पंकजाताई ताई मुंडे व खा.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशाने 500 निराधार कुटूंबांणा किराना सामानाच्या किटचे वाटप सोशल डिस्टनसिंगचे पालन करत केले. या कीट मद्ये 5ज्ञस गहु आटा पॅकेट, 1 तेलपुडा, 1 कि. साखर, 1 फरसनपुडा, मिर्ची हळद मसाला पॉकेट, 1 कि.मुग मटकी, 1 कि.मिठ पुडा, 1 डेटॉल साबन, 1 कपड्याची साबन, तांदुळ इत्यादी दैनंदिन जीवनावश्यक सामान आहे.
हा उपक्रम विकासजी रासकर, आर.के.दिवाकर, राजेंद्रजी मस्के, शरद राठोड, रमेशजी पोकळे, स्वप्निलजी गलधर, भागीरथ बियानी, विक्रांत हजारी, राजेंद्र बांगर, अजिंक्यजी पांडव, चंद्रकांतजी फड, मारुतीजी तिपाले यांच्या मार्गदर्शना खाली भाजपा ओबीसी मोर्चा बीड जिल्हाध्यक्ष तथा लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे सक्रिय सभासद भुषण पवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी गवळी समाज शहराध्यक्ष अशोक परळकर, आशोक दादा चौरे, प्रशांत सुतळे विशाल राठोड, युवराज पवार राजु पवार, पोमा महाराज यांनी भटकँती करनारे (पाल करुन राहनारे) व तंडा व वाडीवस्ती यातील आणि वयस्क निराधार लोकांना या किटचे वाटप केले व हा उपक्रम पूर्णत्वास नेहण्यासाठी परिश्रम घेतले व आपल्या समाजाभिमुख उपक्रमातून निराधारांना आधार दिला. या प्रसंगी गराजवंतांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतीष्ठानच्या व भारतीय जनता पक्षाच्या कार्य पद्धतीवर विश्वास व समाधान व्यक्त केले.
Leave a comment