बीड शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह प्रशासन व मित्र परिवाराची खंबीर साथ
बीड | वार्ताहर
कोरोनामूळे देशभरात लॉकडाऊन झाल्यामूळे बीड जिल्ह्यातही बाहेरील अनेक लोक बीडमध्ये अडकून पडले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी संतोष सोहनी यांनी मदतीला धावत आपल्या एमआएडीसी भागातील वैष्णो पैलेस मंगल कार्यालयात थेट अन्नदानाचा महायज्ञच सुरु केला.
नास्टा , दोन वेळचे जेवन टरबुज, खरबुज, मोसंबी फरसाण आणि केळी सुद्धा देण्यात येत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुरु असलेल्या या अन्नदानाच्या भंडाऱ्याला त्यांचा मित्र परिवार, बीड जिल्ह्यातील व शहरातील व्यापारी वर्ग, तहसीलदार किरण आंबेकर,पोलीस प्रशासन, जैन समाज, माहेश्वरी समाज, राजस्थानी सेवा समाजाचे शिक्षक वृंद, कुटे ग्रुप आदींची मोलाची साथ मिळत आहे.गोरगरिबांची आडचण लक्षात घेता अविरत पणे सुरु असलेला हा अन्नदानाचा भंडारा आता पुढेही १७ मे २०२० लॉकडाऊन संपेपर्यंत सुरु राहणार आहे.
घरच्यापेक्षा उत्तम सोय झाली ही माणुसकी आम्ही कधीही विसरणार नाहीत अश्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.विशेष म्हणजे परजिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि मजूरांच्या १२८ मुलांना संतोष सोहनी यांनी नवीन कपडेही दिले. कपडे मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला. संतोष सोहनी यांच्या या महान कार्यामूळे बीडकरांच्या माणुसकीचे या लोकांना खऱ्या अर्थाने दर्शनच घडत आहे. सैनीकी शाळा, फूड टेक्नोलॉजी कॉलेज, पाली जिल्हा परिषद शाळा, पॉलिटेक्निक कॉलेज, मूकबधिर विध्यालय, येथे थांबलेल्या लोकांपर्यंत दररोज जेवन पोहच केले जात आहे. परजिल्ह्यातील अडकलेले मजूर मुक्त केले असले तरी ३०० ऊसतोड मजूर, निवारा ग्रहातील ५० व्यक्ती आणि इतर २०० अशा एकूण ५५० लोकांना सध्या दोन वेळचे मिष्ठान्न भोजन वाटप केले जात असून लॉक डाऊन संपेपर्यंत गरजवंतांना भोजन देण्यात येणार असल्याचे संतोष सोहनी यांनी सांगितले आहे.
सर्वांच्या खंबीर साथीमुळे अन्नदान - संतोष सोहनी
अन्नदानाच्या या महायज्ञात मला अनेकांची साथ मिळत आहे त्यामूळे मी अन्नदानाचे हे महान कार्य करु शकलो असे संतोष सोहनी सांगतात. बीड जिल्ह्यातील व शहरातील व्यापारी वर्ग, तहसीलदार किरण आंबेकर,पोलीस प्रशासन, जैन समाज, माहेश्वरी समाज, राजस्थानी सेवा समाजाचे शिक्षक वृंद, कुटे ग्रुप अन्न व औषध प्रशासन, बीड शहर व्यापारी महासंघ अध्यक्ष विनोद पिंगळे यांची मोलाची साथ मिळत असून लॉक डाऊन संपेपर्यंत हा अन्नदानाचा महायज्ञ सुरूच राहणार असल्याचे संतोष सोनी यांनी सांगितले आहे.
दोनशे कुटुंबाला दिले किराणा सामान
एकीकडे अन्नदानाचा हा महायज्ञ सुरू असतानाच संतोष सोहनी यांनी बीड शहरातील २०० गरजवंत कुटुंबीयांना एक ते दीड महिना पुरेल एवढे किराणा सामान वाटप केले आहे. ज्या गरजवंतांना हे सामान मिळाले त्यांनी संतोष सोहनी यांचे त्रिवार आभार मानले आहेत.
Leave a comment