बीड/प्रतिनिधी
समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, बीड यांच्या द्वारे निर्मित "दिव्यांगसाथी" या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.दिव्यांगसाथी' (divyangsathizpbeed.com) या विशेष संकेतस्थळा भेट देऊन दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती घ्यावीअसे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे
शासनाच्या या संकेतस्थळावरून दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बँक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल.या संकेतस्थळावरून दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना 5% दिव्यांग कल्याण योजना, विमा, पेंशन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणे, पात्र लाभार्थींना स्वावलंबन कार्ड मिळवून देणे, तपासणी व ऑनलाईन नोंदणी, तसेच आरोग्यविषयक सेवा मिळवून देणे या उद्देशाने बीड शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे.याकरीता नगरपालिका कार्यालय बीड येथे संपर्क करावा. याची सर्व दिव्यांग व्यक्तींनी नोंद घ्यावी. असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
Leave a comment