बीड । वार्ताहर
महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात अडकलेल्या बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी सर्व अर्ज मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन एक सॉफ्टवेअर तयार करीत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात अडकलेल्या बीडमधील सर्व नागरिकांनी हे सॉफ्टवेअर रिलीज होण्याची प्रतीक्षा करावी. या परवानगीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी बीड किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात फोन करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती आज शुक्रवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बीड जिल्ह्यातील अनेक भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक, कंपन्या आणि इतर नौकरी, व्यवसायानिमित्त गेलेले अनेक तरुण तसेच जेष्ठ नागरिक महानगरांसह राज्याच्या विविध भागात अडकून पडले आहेत.दरम्यान या सर्वांना त्यांच्या गृह जिल्ह्यात पोहचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. दरम्यान अनेकजण आता गावी येण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करत आहेत. त्यामुळे त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी वरील माहिती दिली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात अडकलेल्या बीडमधील सर्व नागरिकांनी हे सॉफ्टवेअर रिलीज होण्याची प्रतीक्षा करावी.
Leave a comment