पुणे । वार्ताहर
पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता पावसाला सुरूवात झाली. सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, कात्रज, धनकवडीसह मध्यवर्ती भागातील पेठांत वादळी वारा व विजांच्या गडगडाटात वादळी पाऊस सुरू झाला.  वादळी वार्‍यांमुळे शहरात ठिकठिकाणी झाडे पडली.  दिशादर्शक फलक रस्त्यावर कोसळला  मात्र  लॉकडाउनमुळे रस्त्यावर गर्दी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. 

पुणे शहरातील जेएम रोड, आपटे रास्ता, शनिवारवाडा, शिवाजीनगर पोलीस वसाहत, सिंहगड रस्त्या परिसरातील धायरी, वडगांव येथे झाडे कोसळली आतपर्यंत अशा 50 हुन जास्त घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. जोरदार पावसामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली. बंदोबस्तासाठी पोलिसांनी उभारलेल्या तंबूंना जोरदार वार्‍याचा फटका बसला.
शहरात सायंकाळी मेघगर्जनेसह पाउस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिला होता. मध्यभाग आणि उपनगरात पावसाने हजेरी लावल्यानंतर हवेत काही काळ गारवा निर्माण झाला. दोन ते तीन दिवसांपूर्वी शहरातील दिवसाचे कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले होते तर रात्रीही किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शहरात येत्या दोन दिवस पावसाळी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. गुरूवारी संध्याकाळीही शहरात पावसाचा शिडकावा झाला होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.