नवी दिल्ली

देशातला लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढविण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचं पत्रक काढलं आहे. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशवासियांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. सकाळी 10 वाजते पंतप्रधान बोलणार आहेत. ते काय बोलतील, कुठल्या घोषणा करतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

लॉकडाऊन संपायला आता फक्त 2 दिवस राहिले आहेत. सुरुवातीला 21 दिवसांचा आणि नंतर वाढ करून पुन्हा 19 दिवसांचा लॉकडाऊन देशात लावण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन आता 3 मे रोजी संपणार आहे. तो दोन आठवढे वाढविण्यात आल्याने आता लॉकडाऊन 17 मेपर्यंत चालणार आहे.

त्यानंतर काय उपाययोजना कराव्यात यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने Disaster Management Act 2005 नुसार हा लॉकडाऊन वाढवला आहे. आता देशात 17 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्याच बरोबर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठीही केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

या आधीही दोन वेळा लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं होतं.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.