पाणीटंचाई ग्रामस्थांत संताप
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील अनेक गावात, वाड्या व वस्त्यावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.आष्टी तालुक्यातील हाजीपूर ग्रामपंचायतीने दि. 13 एप्रिल रोजी आष्टी पंचायत समिती ,तहसिलदार यांच्याकडे पिण्याचे पाण्यासाठी तात्काळ टकर मंजुर करावा अशी लेखी मागणी केली या जिव्हाळ्याचे मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थ दाहीदिशा भटकत आहेत. पाणीप्रश्नाकडे पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागाने लक्ष द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने कोरोना असतानाही प्रशासनाचे लक्ष वेधण्यसाठी आनलाईन आंदोलन करावे लागेल असे सरपंच डा.बबन शेकडे व ग्रामस्थांनी आनलाईनव्दारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेली पाच वर्षापासून पर्जन्यमानाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या नाले ,तलाव कोरडेठाक आहेत. किन्ही, लिंबोडी,मेहकरी धरण वगळता इतर धरणे कोरडेठाक आहेत. हाजीपूर गावांत भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी हाजीपूरचा टकर प्राधान्याने मंजुर करावा या परिसरात अजिबात पाणी नाही. टकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलेले आहेत हे गोल गोल उत्तरे देणे बंद करावे असेही निवेदनात म्हटले आहे.तात्काळ स्थळ पाहणी करावी असे सरपंच डा.शेकडे यांनी म्हटले आहे.
Leave a comment