किल्लेधारूर । वार्ताहर

शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या फेरीवाले व इतर अडकलेल्या परप्रांतिय लोकांच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामूळे गावाकडे जाण्याच्या अपेक्षा उंचावल्या असून शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

रोजगार मिळवण्यासाठी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व राजस्थानमधून अनेक कारागीर व बेरोजगार तरुण कुटूंबासह शहरात प्रतिवर्षी येत असतात. यंदाही उन्हाळ्याच्या निमित्ताने थंडपेय व्यवसायिक व पाणी पुरीवाले, फरशी कारागीर, लाकडीकाम करणारे कारागीर, जिनिंग मजूर आदी परराज्यातील कुटुंब शहरात व तालुक्यात आलेली आहेत. मात्र कोरोना वायरसच्या संकटामूळे सर्वांसमोरच आव्हान उभे राहून उपासमारीची वेळ आलेली आहे. सर्व लॉकडाऊन असल्यामुळे आपल्या मुळ गावी जाण्यापासुन वंचित आहेत. वाहन व्यवस्था, रेल्वे बंद असल्याने सर्व कुटूंब अडकली आहेत. शहरात उत्तर प्रदेशचे मुळ रहिवासी असलेल्या कुटूंबाची संख्या आढळून येते.   यापैकी लस्सीवाले रामकृष्ण कुशवाह हे दरवर्षी शहरातील हनुमान चौकात परदेशी लस्सी नावाचे लस्सी दुकान चालवतात. त्यांच्या सोबत एकुण दहा लोक असून यापैकी पाच जन किनगाव येथे अडकली आहेत. रामकेस पाल हे पाणीपुरीचा व्यवसाय करतात. ते देखील आपल्या कुटूंबियातील चार लोकांसोबत मुळ गावी परतण्यासाठी उत्सूक आहेत. रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करणारे राजू निसाद हे देखील आपल्या कुटूंबातील सहा सदस्यांसह गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. शहरात अशी परराज्यातील लोकांची संख्या मोठी असू शकते. शासनाने राज्यात अडकलेल्या परराज्यातील लोकांसाठी मुळगावी परतण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित अडकलेल्या कुटूंबियांची अपेक्षा उंचावली असुन राज्य सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.