परळी । वार्ताहर
परळी तालुक्यातील कन्हेरवाडी लघु प्रकल्पातील पाणी टँकरने आणणे शक्य नसल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडावे या मागणीनुसार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाने आज नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिक फड व त्यांच्या सहकार्यांनी हा तलाव डोंगराळ भागात असल्यामुळे कण्हेरवाडी व परिसरातील गावात पिण्याच्या व जनावरांसाठी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी स्थानिक प्रशासन व पालकमंत्री ना. मुंडे यांच्याकडे केली होती.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने तलावातील शिल्लक पाणीसाठा व अन्य बाबींचा विचार करून आज पाटबंधारे विभागाने नदीपात्रात प्रत्यक्ष पाणी सोडले आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता ठोंबरे,गोरे, गुलभिले, पठाण, देवकते यांच्यासह, कृ.उ.बा. समितीचे संचालक माणिकभाऊ फड, निवृत्ती आप्पा फड, कैलास फड, सूर्यकांत मुंडे, सावन मुंडे,राजेश फड कृष्ण मुंडे, भैय्या फड, समाधान मुंडे, सुधाकर गुट्टे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे कण्हेरवाडीसह जिरेवाडी, ब्राम्हवाडी, बँक कॉलनी, समतानागर, जलालपूर, शंकर पार्वती नगर, प्रिया नगर, बजरंग नगर इत्यादी भागातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
Leave a comment