आष्टी । वार्ताहर
सोलापूरवाडी ते धानोरा दरम्यान असणार्या रेल्वे मार्गाचे काम करणार्या मजुरांना खुंटेफळ,कुंभेफळ,सुम्बेवाडी,धा
सोलापूरवाडी धानोरा दरम्यान रेल्वेमार्गाच्या कामासाठी बाहेरच्या राज्यातून मजूर आलेले आहेत.टाळेबंदी काळात काम बंद असल्याने या मजुरांची उपासमार होत होती.आष्टीचे नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे यांना ही बाब माहीत होताच त्यांनी या कामगारांना धान्य उपलब्ध होईल याची व्यवस्था केली.त्यांच्या पिंपरी (घुमरी) या गावासह धानोरा,पुंडी,खुंटेफळ, कुंबेफळ, सुंबेवाडी येथील ग्रामस्थांनी धान्य व इतर वस्तूंचे संकलन केले. रेल्वेच्या कामावर असलेल्या ठिकाणी जाऊन हे धान्य वितरण करण्यात आले. निवासी नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे, मंडळ अधिकारी संभाजी गवळी,कुंबेफळचे सरपंच बाबासाहेब मुठे, कृष्णा काकडे, राजेश राऊत,पत्रकार गोरख मोरे, जनसेवा हाच ध्यास प्रतिष्ठान सुंबेवाडीचे सदस्य अमर वाळके मेजर, योगेश शेळके,पांडुरंग शेळके, दत्तोबा शेळके,सुखदेव साबळे , बाळासाहेब पवार,अनिल खोटे अनिल शेळके आदी यावेळी उपस्थित होते.
सुंबेवाडीचा आदर्श
पिंपळा गावापासून तीन किलोमीटर असलेली सुंबेवाडी ही अवघ्या शंभर घरांची वाडी.शेती हाच सगळ्यांचा मुख्य व्यवसाय पण त्यांनी ही घरोघरी जाऊन जाऊन धान्य आणि किराणा गोळा केला आणि परमुलखातून रोजगारासाठी आलेल्या मजुरांना मदत केली.
Leave a comment