कडा - रघुनाथ कर्डीले

अखंडितपणे गेल्या 24 वर्षांपासून प्रवाशांची सेवा करणारे कडा येथील रहिवासी असलेले पांडुरंग दत्तोबा कर्डिले आज नियत वयोमानानुसार एसटी मधून चालक पदावरून आज  सेवानिवृत्त होत आहेत. आयुष्यभर रस्त्यावरून प्रवाशांची सेवा करून आज हा सद्गृहस्थ एसटीला अलविदा करणार आहे. प्रवाशांची सेवा करणे हे ब्रीदवाक्य घेऊन 1996 साली चालक म्हणून भरती झालेला हा "पांडुरंग" एसटीतुन आज खाली उतरला आहे.

कडा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले पांडुरंग दत्तोबा कर्डिले यांनी त्याकाळी शेती न करता  नोकरी  करण्याचे ठरवले होते. 1986साली स्वर्गीय रामचंद्र धस दादा यांच्या ट्रक वर चालक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली .नोकरी करत असताना दादांनी  प्रत्येक कामगार हा  घरचा माणूस म्हणून सांभाळ केला. त्यांच्या घरी असणारा प्रत्येक कामगार हा आपल्या घरातला माणूस आहे अशी वागणूक दिली.स्वत: त्यांच्या राहण्याची, जेवणाची व इतर देखभालीची व्यवस्था स्व दादा करत असत.देविदास आबा धस यांनीही या पांडुरंगास मोठी मदत केली.आमदार सुरेश धस त्याकाळी श्रीगोंदा येथे शिक्षण घेत होते त्या काळी पांडुरंग कर्डिले यांनी आमदार सुरेश धस यांना गाडीची स्टेरिंग धरायला लावत चालक म्हणून प्रशिक्षण दिले. त्याकाळी आमदार  पांडुरंग कर्डिले यांना "*पांडू कलर*" या नावाने हाक मारीत असत. ती हाक सुरेश धस  आजही या पांडुरंगाला कुठेही भेटले तरी पांडू कलर याच नावाने हाक मारीत आहेत या हाकेत प्रेमळपणा व मैत्रीचे नाते आजही दिसून येत आहे.

 

पांडुरंग कर्डिले हे  07:11 1996 रोजी नगर विभागातील अकोले तालुक्यात प्रथम चालक म्हणून नोकरीस लागले त्यांनी अकोले सारख्या दुर्गम व डोंगरी भागात प्रवाशांची सुरक्षित सेवा केली. एक प्रसंग असा होता अकोले तालुक्यातील आभाळवाडी  येथील घाटात एसटी चे ब्रेक फेल झाले होते त्यावेळी एसटीमध्ये 40 प्रवासी असताना पाच किलोमीटरचा घाट सुरक्षित खाली उतरून 40 प्रवाशांना जीवदान दिले हा प्रसंग सांगताना आजही पांडुरंग कर्डिले यांच्या अंगावर शहारे येत आहेत.अकोले येथे पाच वर्षे सेवा केल्यानंतर नगर जिल्ह्यातील अहमदनगर या आगारात काही दिवस ड्युटी केल्यानंतर 2007 पासून आजपर्यंत जामखेड आगरामध्ये विनाअपघात व सुरक्षित अशी 24 वर्षे सेवा करून एसटीतील पांडुरंग आज सेवानिवृत्त होत आहे या पांडुरंगास भावी वाटचालीस व भावी जीवनात सुख-समृद्धी व आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....

 

               

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.