बीड । वार्ताहर
कोरोनाच्या आपत्तीमध्ये मदतीचा एक हात द्यावा या उद्देशाने येथील महिला कला महाविद्यालय, बीड प्रचार्य डॉ. सविता शेटे यांच्या मार्गदर्शनातून कापडी मास्क बनविणे हा उपक्रम गृहविज्ञान विभागाद्वारा घेण्यात आला.
महाविद्यालयातील विद्यार्थीनींना मास्क तयार करण्या संबंधीचे प्रशिक्षण देऊन एक हजार मास्क तयार करण्यात आले. यामध्ये प्रौढांसाठी 900 आणि बालकांसाठी 100 मास्क तयार करण्यात आले. या मास्क तयार करण्यामध्ये विद्यार्थीनी आणि गृह विज्ञान विभागाच्या डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. संध्या आयस्कर यांनीही सहभाग नोंदविला. सदरील मास्क स्थितीत आवश्यक सेवेत आसणारे स्थानिक प्रशासनातील पोलिस, आरोग्य, स्वच्छता आणि इतर विभागातील कर्मचारी-कोरोना योध्यांकरीता तयार करण्यात आले आहेत. सदरील तयार केलेले मास्क बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दि. 29 एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सविता शेटे, गृह विज्ञान विभागाच्या डॉ. वर्षा कुलकर्णी, डॉ. संध्या आयस्कर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी महाविद्यालय, गृह विज्ञान विषयाची माहिती घेतली. विद्यार्थीनी, प्राध्यापक आणि महाविद्यालयाची या कामाबाबत प्रशंसा केली.
Leave a comment