केज । वार्ताहर
केज शहरातील क्रांती नगर भागातील माजी नगरसेवक पती लक्ष्मण जाधव यांनी क्रांतीनगर प्रभागातील नागरीकांना किराणा सामान व जिवनावश्यक वस्तू वाटपांचा शुभारंभ केला असून प्रत्येक कुटुंबाला या किटचे वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे या भागातील नागरिकांना सद्य स्थितीत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. आत्माराम बापू प्रतिष्ठान व लक्ष्मण जाधव मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केज शहराचे नगराध्यक्ष आदित्य दादा पाटील यांच्या आदेशानुसार, पशूपतिनाथ दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती नगर,कोल्हे वस्ती,भवानी माळ, धारूर रोड या भागातील नागरिकांना मदतीचा हात देत जिवनावश्यक वस्तू व किराणा सामानाचे वाटप सुरू करण्यात आले असून क्रांतीनगर येथून शुभारंभ करण्यात आला आहे आहे.
या भागातील नागरिक हे गरीब, मेहनती व कष्ट करून आपली उपजिवीका भागवनारे आहेत. परंतु कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे व व्यव्हार बंद आसल्याने सद्यस्थितीत या भागातील नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व महिनाभर पूरेल एवढे साहित्य किराणा सामानाचे किट जवळपास 600 कुटुंबातील लोकांना मदत उपलब्ध होणार आहे. या उपक्रमा मूळे सर्वत्र लक्ष्मण जाधव यांचे कौतुक होत आहे. या भागातील नागरिकांच्या प्रत्येक सूख दुख्खात लक्ष्मण जाधव हे नेहमीच सहभागी असतात व समाजपयोगी कामामुळे ते परिचित आहेत. ते समाज कार्यात सतत सहभागी असतात. या जीवनावश्यक वस्तू वाटप शुभारंभ प्रसंगी वेळी लक्ष्मण जाधव मित्रमंडळातील बहूसंख्य युवक कार्यक्रते,नागरिक उपस्थित होते.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर वरिल सर्व मदत सोशल डिस्टनचा वापर करून देण्यात आली.
Leave a comment