माजलगाव । वार्ताहर
माजलगांव मतदार संघाचे आमदार प्रकाशसोळंके यांच्या आदेशाने पुनर्वसनमधील बारा हजार लोकांची फिवर स्क्रीनिंग गुरुवारी करण्यात आली. कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी जनतेच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देत आज खानापूर, रेणापुरी, शेलापुरी, ब्रम्हगांव, चिचंगव्हाण, पुनंदगाव, नागझरी, देवखेडा, नांदुर,कडीवडगाव,भटवडगाव येथील घरोघरी जाऊन फिवर स्क्रिनिग टेस्ट केली.
सकाळी 7 वाजल्यापासून आरोग्य विभागाची टिम तपासणी करत असून गुरुवारी जवळपास 70 टक्के तपासणी झाली आहे . स्वतःआ प्रकाश सोळंके यांनी प्रत्येक गावात जाऊन तपासणी पथकाला भेटी दिल्या व कोणताही नागरिक तपासणी पासुन वंचित राहणार नाही यांची काळजी घेण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या.उर्वरित तपासणी शुक्रवारी केली जाणार आहे. यावेळी सभापती अशोक अबा डक,डॉ उद्धव नाईकनवरे, समाज कल्याण सभापती कल्याण आबूज , कारखान्याचे व्हॉईस चेअरमन घाटूळ नाना ,तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, डॉ.उध्दव नाईकनवरे तालुका आरोग्य अधिकारी डॉ .अनिल परदेशी , बी.डी.ओ. चव्हाण, डॉ. पारगांवकर , काँग्रेस कमिटीचे दत्ता कांबळे , भगवानराव कदम , बाळासाहेब जोगडे ,अर्जुन नाईकनवरे, शशिकांत मस्के , सरपंच प्रकाश शिंदे ,माऊली शेडंगे , सह आरोग्य विभागाचे कर्मचारी, स्थानिक अशा स्वयंसेवक , अंगणवाडी कार्यकर्ता ग्रामसेवक उपस्थित होते.
Leave a comment