धारुर । वार्ताहर
येथील बालाघाट प्रतिष्ठाणच्या वतीने सोशल डिस्टंसिंग पाळत शहरातील गोरगरीब, गरजवंत कुटुंबांना दैनंदिन गरज असणा-या जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप शुक्रवारी (दि.1) तहसिलदार व्ही.एस.शेडोळकर, पोलिस निरीक्षक सुरेखा धस, नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान रेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट भरणा-या लोकांचे जगणे अवघड झाले आहे. या परिस्थितीची जाण ठेऊन बालाघाट प्रतिष्ठाणच्या वतीने शहरातील गोरगरीब व गरजू कुटुंबांना रोज गरज असणा-या जिवनावश्यक वस्तूच्या 1500 किटचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची आज दि.1 शुक्रवार रोजी तहसिलदार व्ही.एस.शेडोळकर, पोलिस निरीक्षक सुरेखा धस, बालाघाट प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी यांच्या हस्ते वाटप करुन सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील शंभर ते दिडशे गरजूंना सोशल डिस्टन्सचा वापर करत या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगर पालिका उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक संतोष बप्पा सिरसट, चोखाराम गायसमुद्रे, बाळासाहेब खामकर, सुरेश लोकरे, सचिन दुबे, राष्ट्रीय खेळाडू आनंदसिंह दिख्खत, अॅड.मोहन भोसले, विरेंद्र अवस्थी, दिपक पटवर्धन आदींची उपस्थिती होती.
Leave a comment