माजलगाव-धारुर । वार्ताहर
माजलगांव मतदार संघाचे आ.प्रकाश सोळंके यांच्या वतीने माजलगाव नंतर आता धारुर शहरातही फिवर स्क्रीनिंग करण्यात येत असून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी जनतेच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य दिले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी दिली.
गेल्या तीन दिवसापासून माजलगाव शहर तसेच खानापूर, रेणापुरी, शेलापुरी, ब्रम्हगांव, चिचंगव्हाण, पुनंदगाव, नागझरी, देवखेडा, नांदुर या पुनर्वसित गावात घरोघरी जाऊन जनतेची फिवर स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली. तशीच सकाळी 7 वाजल्यापासून आरोग्य विभागाची टिम सदरील तपासणी करणार आहे.आ.प्रकाश सोळंके यांनी प्रत्येक गावात जाऊन तपासणी पथकाला भेटी देत कोणताही नागरिक तपासणी पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेतली.माजलगाव नंतर आता धारुर शहरातही आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या वतीने प्रभाग निहाय फिवर स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात सर्व जनतेने सहकार्य करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन निर्मळ यांनी केले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी जनतेच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य दिल्याचे सांगितले.
Leave a comment