शिवभोजनच्या नावावर दररोज चहा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष.
किल्ले धारुर (वार्ताहार)
किल्ले धारुर शहरात शिवभोजन योजनेच्या नावाखाली दररोज चहा विक्री करत असुन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असुन शासनाचे नियम धाब्यावर बसवुन नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.तरी या कडे प्रशासन डोळे झाक करत असुन अशा शिवभोजनचा परवाना रद्द करुन सदरील व्यक्ती वर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधीकारी यांच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की,किल्ले धारुर बस स्थानका समोरील हाँटेल रेनुका यास शिवभोजन योजना चालविण्यास देण्यात आली असुन,या ठिकाणी दररोज चहा विक्री केली जात असुन,चहा पिण्यासाठी नागरीक मोठी गर्दी करत आहेत याठिकाणी कुठलाही सोशयल डिस्टंन्स पाळण्यात येत नसुन या संपुर्ण प्रकाराकडे प्रशासनाचे कुडलेही लक्ष नाही तरी.अशा शासनाचे आदेश पायदळी तुडवत धंदा करणाऱ्या हाँटेल चालकाचा शिवभोजन परवाना रद्द करुन कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधीकारी यांच्याकडे केली आहे.
Leave a comment