केज वार्ताहर

केज तालुक्यातील सर्व तलावातील अवैद्य पाणी उपसा बंद करण्याचे तहसीलदार केज यांनी आदेश सर्व मंडळ अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तहसिलदार दुलाजी मेंढके यांनी मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या तालुक्यातील पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीत संदर्भीय पत्र क्र. क्रमांक र०२०/कक्ष-पिपाट./कावी.२५२/सीआर - २८५ दिनांक २३/०४/२०२० अनुषंगाने सर्व महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी यांना आदेश आपण आपले मंडळातील तलावातील अवैध रित्या होणारा पाणी उपसा बंद करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्या पथकातील कर्मचारी, लाईनमन मंडळ अधिकारी, तलाठी यांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी. तसेच तलावातून अवैध रित्या पाणी उपसा होतअसल्यास सदरील मोटारी बंद करून सदर मोटारीचे विद्यूत कनेक्शन बंद करण्यात यावेत. जर शेतकरी मोटारी बंद करण्यास विरोध करत असतील तर विद्युत मोटारी जप्त करुन संबंधीत तलावाचे उपअभियंता यांचे कार्यालयात जतन करून ठेवाव्यात.

सर्व पथक प्रमुख व मंडळ अधिकारी यांनी आपले मंडळात भेट देवून सदर तलावातील पाणी उपसा बंद करावा व त्याच दिवशी अहवाल संयुक्त स्वाक्षरीने समक्ष सादर करावा. असे आदेश निर्गमित केले आहेत. 

यांच्या प्रती विडा, केज, नांदुरघाट, होळ, युसुफ वडगांव बनसारोळा, उप-अभियंता जि.प.ल.पा. उपविभाग केज, उप-अभियंता ल. पा. उपविभाग केज, शाखा अभियंता जलसिंचन शाख केज, शाखा अभियंता मांजरा प्रकल्प धनेगांव यांना दिल्या आहेत. तसेच माहितीसाठी  मा. जिल्हाधिकारी बीड यांना माहितीस्तव

उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे केज, पोलीस उपनिरीक्षक युसुफ वडगांव, सहायक अभियंता वि.वि.कंपनी केज, सर्व मंडळातील लाईनमन यांना सुचना देऊन तलावातील मोटारी बंद करणेसाठी विद्युत पुरवठा बंद करावा. जिवीत व वित्त हाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.