मागील 34 दिवसांपासून मदतीचा ओघ
बीड । वार्ताहर
कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे हातवर पोट असणार्या सायकल रिक्षा चालक, वयोवृद्ध कुटूंबाचे मोठे हाल होत आहेत. पण देवाला काळजी म्हटल्या सारखं,आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वाभिमान’चे देवदूत यांच्यासाठी मागील 34 दिवसापासून प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्था करत आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
कोरोनामुळे होत्याचं नव्हतं झाल आहे. चार घरातील धुनीभांडी करुन आपला संसार रथ चालवणार्या वृद्ध दाम्पत्याची परिस्थीती पाहूण कुणाचेही डोळे पानवल्या शिवाय राहणार नाहीत. लॉकडाऊनमुळे सायकल रिक्षा बंद पडली. तर वृद्ध आजींचे भांडीधुनीचेही काम बंद झाले. या काळात त्यांना अत्यंत मदतीची गरज होती. याची माहिती स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांना मिळाली. त्यांनी किराणा साहित्य व अन्न धान्य या कुटूंबास पोहच केले. यावेळी त्यांच्या सोबत आलेले पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनाही या दाम्पत्याची परिस्थीती पाहूण मायेचा पाझर फुटला.वृद्ध दाम्पत्याच्या जवळ जात त्यांनी त्यांना अर्थिक मदत केली. स्वाभिमानचे मावळे मागील 34 दिवसापासून शहराच्या विविध ठिकाणी अशा गरजुंना शोधून त्यांना मदत करत आहेत. यासाठी त्यांना या कार्यामध्ये बाळासाहेब कदम, भोला जाधव, नितीन डिसले, विनोद काळे, गणेश माने, सागर टेकाडे, मयुर त्रिभुवन हे मदत करत आहेत. त्यांच्या सुरु असलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतूकही होत आहे.
Leave a comment