बीड । वार्ताहर
जिल्हा पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचार्यांना पोलिस महासंचालकांचे उत्कृष्ट सेवा पदक गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील मोहन क्षीरसागर, नरेंद्र बांगर तर महामार्ग विभागात कार्यरत गणेश दुधाळ तसेच सध्या बीडच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले पो.ना.शेख अब्दुल माजेद शेख सईद यांचा समावेश आहे.
पोलिस दलात उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांना पोलिस महासंचालकांकडून उत्कृष्ट सेवा पदक बहाल केले जात असते. पोलिस दलात या सेवा पदकाला मोठे महत्व आहे.महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलाने महासंचालकांच्या उत्कृष्ट सेवा पदकांची घोषणा केली. यामध्ये बीड जिल्हा पोलिस दलात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत मोहन क्षीरसागर, नरेंद्र बांगर तर पूर्वी दरोडा प्रतिबंधक पथकात व सध्या महामार्ग विभागात कार्यरत गणेश दुधाळ या पोलिस कर्मचार्यांना हे पदक जाहीर झाले आहे. दरम्यान औरंगाबाद येथील दहशतवाद विरोधी पथक आस्थापना असलेले आणि सध्या बीडच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेले पो.ना.शेख अब्दुल माजेद शेख सईद यांनाही हे पदक जाहीर झाले आहे. या यशाबद्दल त्यांचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी व पोलिस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
भूमीपुत्राचाही सन्मान
वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी तथा नांदेड येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत श्रीराम खटावकर यांनाही पोलिस महासंचालकांचे सेवा पदक जाहीर झाले आहे.
Leave a comment