10 दिवसात नागरिकांनी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतून काढली 30 लाखाची रक्कम 

बीड । वार्ताहर

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी ज्यांना सध्याच्या लॉक डाऊन च्या परिस्थितीत त्यांची उपजीविका भागविणे कठीण जातेय, त्यांना ‘प्रधानमंत्री गरिब कल्याण योजने’च्या माध्यमातून रु.1 लाख 70 हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला असून सदरील रक्कम जन-धन योजना किसान योजना, उज्ज्वला योजना इ. योजनांच्या लाभाध्थ्याच्या बँक खात्यांमध्ये टप्या-टप्प्याने जमा केली जात आहे. 

यामध्ये प्रामुख्याने महिला जन धन खातेधारकांच्या खात्यावर रुपये 500 प्रति महिना (3 महिन्यासाठी) आणि शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर रूपये 2000 (पीएम किसान योजने अंतर्गत पहिला हप्ता) तात्काळ जमा केले जात आहेत. अशा परिस्थितीत गावातील नागरिकांची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी आपल्या गावातील डाक कार्यालयामध्ये कार्यरत असणाच्या पोस्टमास्तर,पोस्टमन यांचे मार्फत नागरिक आपल्या राष्ट्रीयीकृत व खाजगी बँक खात्यांमधून (महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्य, बँक वगळून) लाभाची किंवा इतर कोणतीही रक्कम एईपीएसद्वारे आधार नंबर आणि मोबाइल नंबर वापरून काढू शकतात. जिल्ह्यात मागील 10 दिवसात नागरिकांनी जवळपास 30 लाख रुपये पोस्ट ऑफिसमधून एईपीएसद्वारे काढले आहेत. पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत देण्यात येणार्‍या एईपीएस या सुविधेद्वारे ही सेवा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डाक अधीक्षक बीड विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे. 
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.