धारुर । वार्ताहर
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बीड जिल्ह्यात सात ते साडे नऊ वाजता संचारबंदी शिथिल असलेल्या काळात बँक चालू ठेवण्याचे आदेश आहेत .ज्या दिवशी बँक कामकाज असते त्यादिवशी पेन्शन धारक, शेतकरी,वृद्ध माता-भगिनी ,व इतर व्यक्ती सकाळी 6 पूर्वी बँकेच्या दारात रांगा लावून बसलेल्या पहावयास मिळत आहे.
प्रत्येक शाखेसमोर दोनशे ते तिनशे खातेदार रांगेत उभे राहिलेले दिसुन येत आहे. अनेक खातेदारांना वेळेअभावी रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.वरील बाबी विचारात घेता रस्त्यावरील लागलेल्या रांगा यामुळे एखाद्या रांगेतील एखाद्या वयोवृध्द व्यक्तीचे बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जनता विचारू लागली आहे. तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींना मास्क लावणेबाबत जागृती करणे हात धुण्यासाठी सॅनिटायझेर देणे या बाबी बँकेतर्फे झाल्या तर काय हरकत आहे? कारण बहुतांशी प्रमाणात वयस्कर लोक रांगेत उभे असलेले पाहायला मिळाले आणि त्यांनाच कोरोना आजाराचा जास्त धोका आहे. याचबरोबर या वृद्ध व्यक्तींना त्यांच्या रकमा गर्दी न करता कशा वाटप करता येतील याचे नियोजन बँकेतर्फे होणे गरजेचे आहे,अशी मागणी पेन्शनरांमधून करण्यात येत आहे.
Leave a comment