तलवाडा । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील मौजे सिंदखेडच्या ठोसर कुटुंबातील शेतकरी बांधवांनी मोठ्या जिध्दीने व कष्टाने भेंडी व फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले होते. परंतु त्यांच्या कष्टाला बळकटी येण्याच्या क्षणाला देशाच्या राजधानी दिल्लीसह देश व राज्यभरात कोरोना सारख्या महाभंयकर महामारीने धांदल उडवली.त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांचा जीव कासावीस झाला आहे.
भेंडी, गलाडा, झेंडु, मोसंबी, सह सर्व पिके आजघडीला ऊध्वस्थ झाली आहे. त्यामुळे लाखो रुपयाचा तोटा सहन करण्याची नामुष्की शेतकरी बांधवावर आली असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात ठिक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. सद्यस्थितीत राज्याची स्थिती पाहता कोणत्याही मागण्या करने योग्य नसले तरी शेती मालाचे पंचनामे करुन अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात म्हणुन शेतीमाल शासनाने खरेदी करुन बळीराजाची आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत सुनिल ठोसर यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.
Leave a comment