बीड । वार्ताहर
30 बीड पासुन जवळच असलेल्या नवगण राजुरी या गावामध्ये काही हातावर पोट असणार्या धनगर समाजाच्या नऊ कुटुंबाची पाले आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय डबे, चाळणी तयार करून तो विकणे आज पर्यंत त्यांच्याकडे कसली मदत पोहोचली नव्हती परंतु बीड पोस्टल कर्मचार्यांच्यावतीने त्यांची दखल घेत आज पालावर प्रत्यक्ष जाऊन किराणा किट वाटप केलं यामध्ये अत्यावश्यक साहित्य व साबणाचा समावेश होता.
लॉकाडाऊन मुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत यांचा फटका या पालात राहून डबे चाळण्या तयार करुन विकणार्या फिरस्ती भटक्या लोकांना जास्त बसला आहे. एका गावात तीन ते चार महिने राहतात. राशन कार्ड नसतं, शासनस्तरावर कसली मदत नाही. गावात फिरून व्यवसाय करू दिला जात नाही. त्यामुळे उपजीविकेचे साधन त्यांच्याकडे नाही उपास मारीची वेळ आहे. अशा गरजवंत गरजू लोकांना शोधुन बीड पोस्टल कर्मचार्यांच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरा पासून किराणा किट साहित्य वाटपाचे काम चालू आहे व त्यामध्ये खरेच गरजेचे आहेत अशांना शोधून या किराणा किट दिल्या जात आहेत. नवगण राजुरी या गावालगत ऐकुन नऊ कुटुंब असलेल्या पालावर आज किराना किट वाटप करण्यात आले त्याप्रसंगी पोस्टल कर्मचारी अमरसिंह ढाका, सुरेंद्र जावळे, इमरान तांबोळी, युवा नेते गौतम कांबळे, नितीन गायकवाड संकेत गायकवाड, गावडे आदी उपस्थित होते.
Leave a comment