धोंडराई । वार्ताहर
पाण्याच्या व खाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या हरणाच्या कळपापैकी एका हरणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हे हरीण गंभीर जखमी झाले होते.रस्त्याच्या कडेला पडलेले जखमी हरीण दिसताच धोंडराईतील तरुणांनी त्या हरणाला आपल्या मोटारसायकल वर टाकुन धोंडराई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्यावर उपचार करुन त्या हरणास गावातील शाळेत ठेवून जखमी हरणाचे प्राण वाचवले .मानवतेचे दर्शन घडवणारी ही घटना मंगळवारी (दि.28) रोजी धोंडराई परिसरात घडली.
सध्या लॉकडाउन लागलेले असताना रस्त्यावर वाहनांची संख्या ही फारशी कमी झालेली आहे तरी पण काही शौकीन ड्रायव्हर आपल्या वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षा जास्त ठेवतात त्याचीच सजा बिचार्या मुक्या जिवांना भोगावी लागते. सुदैवाने गावातील तरुण इरफान शेख, संदीप निकम, अफरोज शेख (मोट्या), भागवत टेकाळे यांनी त्या जखमी हरणावर उपचार करून रात्री त्याला गावातील जिल्हा परिषद शाळेत ठेवून वन विभागाशी संपर्क करुन जखमी हरणास वनविभागाच्या ताब्यात देऊन त्याचे प्राण वाचविण्याचे महान कार्य या तरुणांनी केले.वनरक्षक डि .एस गाडेकर यांनी आपल्या सहकार्यांना पाठवुन सदरील जखमी हरीण ताब्यात घेतले.
------------
Leave a comment