कोरोनाचा धोका टाळण्यासाठी बंदोबस्त वाढवण्याची गरज
तलवाडा । वार्ताहर
शासन स्तरावर कोरोना या महामारीला हरवन्यासाठी विविध पातळीवर प्रयत्ण होत असतांना ग्रामीण भागातील नागरिकांना गांभीर्य नसल्याचे चित्र जालना व बीड जिल्ह्याच्या मंगरुळ बंधार्यावर दिसुन आले.
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन कोरोना सारख्या महाभंयकर महामारीला हरवण्यासाठी जिद्धीने कामाला लागलेले असुन परराज्यातुन कोन्ही ही अनोळखी किवा परिचीत व्यक्ति आपल्या राज्यात येऊ नये या साठी ठिक ठिकाणी चेक पोस्टाव्दारे नियंत्रण ठेवण्यात येत असुन याच अनुषंगाने परजिल्ह्यातुन कोन्हीही आपल्या जिल्ह्यात शिरकाव करु नये यासाठी त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन व विविध शासन स्तरावरील पदाधिकारी प्रयत्नशील असतांना ग्रामीण भागातील नागरिक कोरोना सारख्या महाभंयकर महामारीला हरवण्याऐवजी पसरवण्याचा घाट घालुन बसल्याचे एंकदरीत चित्र विविध जिल्ह्याच्या हादबंदीच्या आवक जावक मार्गावर दिसुन येत आहे जालना व बीड जिल्ह्याच्या मध्य भागातुन गोदावरी नदी वहात असुन या गोदावरी परिसरात आणेक ठिकाणी बंधारे बांधलेले असुन या बंधार्यावर पोलीस प्रशासनाने कर्मचार्याच्या संख्यानुसार एक दोन कर्मचारी प्रतेक बंध-यावर बंदोबस्त ठेऊन देखील गोदावरी नदीच्या ज्या भागात तुरळक पाणी आहे त्या भागातुन बंधार्यावरील पोलीसांना हुलकावनी देत नागरिक जिल्ह्याच्या सिमा ओलांडतांना दिसुन येत असुन मंगरुळ बंधार्यावर असलेले पोलीस कर्मचारी बंधार्यावर कटाक्षाने लक्ष ठेऊन असले तरी गोदावरी नदीच्या बंधार्यावीत भागावर बंदोबस्त वाढवण्याची गरज असल्याचे दिसुन येत असुन हिच परिस्थिती इतर बंधार्याच्या आजुबाजूने सुद्धा दिसुन येत आहे.
Leave a comment