गेवराई । वार्ताहर

गेवराई शहरातील नगर परिषद मार्फत कचरा वाहुन नेणार्‍या घंटागाड़ी चालकांचा प्रभाग 2 मधील नगरसेविका सिमा संजय इंगळे यांनी औक्षण करुण त्यांचा यथोचित गौरव केला आहे. त्यामुळे समाजात एक चांगला संदेश गेला आहे. त्यांच्या या उपक्रमाची शहरात मोठी चर्चा होत आहे. कोरोना विषाणूचा मारा कमी करण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊन मध्ये संचारबंदीत जीवाची जोखिम पत्कारून शहरातील घरामधुन जमा झालेला केर कचरा आपल्या घंटा गाडितुन वाहुन नेहनयाचे काम हे सफाई कामगार नित्यनियमाने करत आहेत.

शहरातील गल्ली बोळातील कचरा रस्त्यावर पडू नये त्याची दुर्घनंदी पसरून नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचु नये म्हणून नगर पालिकेने घंटागाड्या सुरु केलेल्या आहेत, ही घंटा गाड़ी घेऊन शहरातील घरा घरा मधुन साचलेला कच्चा आणि सूखा केर कचरा घंटा वाजवून आपल्या नमून दिलेल्या गाडितुन वाहून नेणारे सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावा म्हणून प्रभाग 2 च्या नगरसेविका सीमा इंगळे यांनी शिवाजीनगर येथे आपल्या महिला कार्यकर्त्या सहित या कर्मचार्यान्चे औक्षण करुण त्यांचा सत्कार केला त्यांना नगद आर्थिक मदत देवून स्वच्छता दूत म्हणून सन्मान केला,नागरसेवकानी आपल्या कामाची दखल घेतल्याने ते कर्मचारी भारावून गेले होते. गेल्या 4 वर्षापासून आ.लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 4 वर्ष सक्रिय नगरसेविका म्हणून सीमाताईनी काम केले आहे. मदतीला धावून येणारी नगरसेविका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे पती संजय हे ही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात नुकताच त्यांनी लॉकडाऊन मध्ये कामधंदा बंद असणार्‍या गोर गरीबांना अन्नदान केले व धान्याचे किट ही दिले. त्यांच्या या कामाची मोठी प्रसंसा सुरु आहे. त्यांच्या सतकार्याचा आदर्श इतर नगरसेवकांनी विशेषता माहिला नगरसेवीकांनी घ्यावा व आपल्या प्रभागतिल गरीब कुटुंबाची काळजी घ्यावी अशी मागणी शहरात होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.