बीड । वार्ताहर
पुणे येथील महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा व राज्य समन्वयक विजय वरुडकर आणि रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन पुण्याचे संचालक तथा समन्वयक वैभव मोगरेकर यांच्या वतिने बीड शहरातील घरोघरी दैनिकाचे वितरण करणार्या मुलांना जीवनावश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले. यावेळी मानव विकास संस्था शेलापुरीचे अध्यक्ष हरी गिरी, संपादक दिलीप खिस्ती, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष चौरे, पत्रकार विशाल साळुंके, उदय जोशी यांची उपस्थिती होती.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनिकांचे वितरण बंद असल्यामुळे घरोघरी वितरण करणार्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब लक्षात घेवून महाएनजीओ पुण्याचे अध्यक्ष शेखर मुंदडा राज्य समन्वयक विजय वरुडकर, फेडरेशनचे जिल्हा समन्वयक वैभव मोगरेकर यांनी या कामगारांना आधार देण्यासाठी किराणा वस्तुचे वितरण केले. यावेळी शहरातील 50 गरजु दैनिक वितरण करणार्या कामगारांना वितरण केल्यानंतर या संस्थेच्या वतिने तालुक्यातील पाली, चिंचोली, बीड शहरालगतच्या वस्त्या येथील 115 जणांना या वस्तुंचे वितरण केले. आज 165 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून कोरोनाच्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून या संस्थेच्या वतिने 875 दिव्यांग, निराधार, होतकरु कामगार यांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती मानव विकास संस्थेचे अध्यक्ष हरि गिरी यांनी दिली. या कार्यक्रमास अध्यक्ष हरि गिरी, संपादक दिलीप खिस्ती, सुभाष चौरे, उदय जोशी, विशाल साळुंके, दिव्यांग निवारा प्रकल्पाचे संचालक सचिन जगताप, शरद अंदुरे यांची उपस्थिती होती.
Leave a comment