आधुनिक शेती करणाऱ्या रोकडे यांना मोठा फटका
नेकनुर/ मनोज गव्हाणे
आधुनिक शेतीची कास धरीत हवामानाचा समतोल राखण्यासाठी शेडनेट लाखो खर्च करीत दोन एकरावर लावलेल्या सिमला मिरचीला जोरदर फळ आले मात्र बाजारपेठ बंद असल्याने लाखोची मिरची हजारोच्या घरातही फायदा करणारी नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. याशिवाय बंद बाजारपेठेने रोकडे परिवाराच्या खरबुजाची गोडी जागीच अडकली आहे.
नेकनूर येथील अंबादास रोकडे यांच्यासह त्यांची मुले विलास आणि सारंग यांनी व्यवसायासोबत आधुनिक शेतीची कास धरीत परिसरात शेती दिशादर्शक केली आहे. सध्या त्यांच्याकडे दोन एकर खरबूज आणि दोन एकर शिमला ढोबळी मिरची फळाला आली आहे. या दोन्ही साठी त्यांनी शेतीत आधुनिक प्रयोग राबवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. बेडवरील खरबूजला चहूबाजूंनी नेट तर शिमला मिरची साठी शेडनेट साठी मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर दर्जेदार जाळी बरोबर हवामान योग्यरीत्या राहण्यासाठी मिरचीच्या झाडावर वरतून पाणी फवारनारी यंत्रणा राबवली . आठवडाभरापासून निर्यातक्षम खरबूज आणि मिरची तोडणीला आली असली तरी शहरातील मागणी असलेल्या बाजारपेठ बंद असल्याने अपेक्षित भाव मिळाला नाही . सध्या दोन कीलोचे खरबूज दहा ते पंधरा रुपयाला तर मिरचीला प्रति किलो 15 रुपये भाव मिळत अासल्याने लाखोचा उत्पन्न खर्च निघणार कसा या विवंचनेत ते सापडले आहेत. बाजारपेठ बंद असल्याने रोकडे परिवारासाठी मिरची तिखट बनली तर खरबूजाचा गोडवा हिरावला गेला आहे.
आधुनिक शेतीच्या बळावर निर्यातक्षम उत्पन्न घेणाऱ्या रोकडे यांना राज्यातही बाजारपेठ बंद असल्याचा फटका बसतो आहे.
नागपूर बाजारपेठत शिमला मिरचीला मागणी असते मात्र कोरोनाचा पादुर्भाव या शहरात असल्याने तेथून मागणी नाही यामुळे मोठा खर्च करून सावली आणि तापमानाचा समतोल राखणाऱ्या या शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडली याशिवाय दोन एकरावरील खरबुजालाही भाव नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
Leave a comment