*

आष्टी  । वार्ताहर

साखर कारखाना गळीत हंगाम संपूनही लॉकडाऊनमुळे अनेक ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले होते . शासनाने त्यांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिल्यावर हे ऊसतोड कामगार आपापल्या गावी परतले . मात्र त्यांना थेट आपल्या घरी न जाता गावाबाहेर शेतातच क्वारंटाइन व्हावे लागले . कुठे शाळेत तर बहुतेक ठिकाणी पाणी उपलब्ध असेल अशा ठिकाणी झोपड्या करून हे कामगार आपले कुटुंब आणि जनावरांसह राहत आहेत . त्यांना किराणा किंवा इतर जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत होती . ऊसतोड कामगारांचे आष्टी तालुक्यातील नेते विजय गोल्हार यांनी अनेक गावातील संख्येनुसार किराणा मालाचे वर्गीकरण केले . आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे गणेश मंडळ आष्टी यांच्या माध्यमातून  थेट त्यांच्या पालावर जात किराणा आणि अन्न धान्य वितरण केले . इतकेच नाही तर त्या गावातील इतर गोरगरिबांना आणि दिव्यांग व्यक्तीना देखील हा किराणा दिला . लिंबोडी येथे किराणा वाटप करताना सरपंच आदिनाथ आंधळे , माजी सरपंच समाधान आंधळे , हभप आंधळे महाराज आणि इतर उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.