शिक्षा नव्हे व्यायामाचे दिले धडे
माजलगाव । वार्ताहर
शिकले अन हुकले असे आज ही ग्रामीण भागात मार्मिक रित्या बोलले जाते तसाच प्रत्यय आज पहाटे 5 वाजता माजलगाव शहरात आला.आयुष्यात कधी मॉर्निंग वॉक ला न जाणारे लॉक डाऊन मध्ये गपप्पा मारण्यासाठी सकाळी बाहेर पडू लागले आणि असे शिकून हुकलेले महाभाग आज माजलगाव पोलिसांच्या हाती लागले.यांना वाशीम सारख्या महानगरात ज्याप्रमाणे हातात पाट्या धरण्यास लावल्या तशा शिक्षा न देता घरी करण्यासाठी व्यायामाचे धडे स्वतः पोलीस निरीक्षक सुरेश बुधवत यांनी दिले व उध्यापासून गुन्हे दाखल करण्यात येईल म्हणून सूचना दिल्या.
मुंबई, पुणे, औरंगाबाद सह आदी जिल्ह्यात कोरोना चे रुग्ण वाढत आहेत म्हणून सरकार यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आज संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारी मुळे सर्व काम ठप्प पडली आहेत.लॉक डाऊन संपून लवकर देश सुरळीतपणे चालणे आवश्यक असताना.जास्त शिकलेले आणि निव्वळ हुकलेले असे माजलगाव शहरातील शिक्षक,बँक कर्मचारी,व्यापारी गप्पा मारण्यासाठी सकाळी बाहेर पडू लागले.आज पोलीस निरीक्षक बुद्धवत यांनी संभाजी चौकात या सर्वांना गाठले आणि शिक्षा न देता त्यांच्या कडून तासभर व्यायाम करून घेतला.व्यायाम काय असतो हे गप्पा मारण्यासाठी बाहेर पडलेल्या या महाभागां ना आज कळला असेल अशी आशा करायला हरकत नाही.
सकाळी मॉर्निंग वॉक व पोहायला घराच्या बाहेर पडत असल्याने माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय अविनाश राठोड यांनी आज सकाळी मॉर्निग वॉक ला जाणाऱ्यांना केसापुरी कॅम्प पासून सर्वांना एकत्र करत संभाजी चौकात आणले. मॉर्निग वॉक च्या नावाखाली बाहेर फिरायला जणाऱ्याचे ताटलेले अंग मोकळं करण्यासाठी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पी आय सुरेश बुधवंत यांनी पोलीस बंदोबस्तात संभाजी चौकात अंगातून घाम निघे पर्यंत एक तास व्यायाम करून घेतला आहे. यात मॉर्निग वॉक ला जाणाऱ्या महिला, पुरुषां कडून व्यायाम करून घेतला खरा पण उद्या सकाळी हे महाभाग झोपेतून उठतील का नाही हे मात्र सांगने कठीण आहे.
मॉर्निग वॉक च्या नावाखाली बाहेर शिळ्या गप्पा मारणार्यांना चांगलाच चाप बसला असल्याचे दिसून आले .
पी आय बुधवन्त यांनी ही गाळला घाम
आजच्या कारवाईत विशेष कौतुक करावे असे काम शहर पोलीस ठाण्याचे पी आय बुधवन्त यांनी केले.या सर्व जॉगिंग कर्त्या सोबत प्रत्येक व्यायाम बुधवन्त यांनी स्वतः करून स्वतः किती फिट आहेत हे दाखवून दिले तसेच या महाभागां ना अपमानित न करता त्यांची कृती चूक असल्याचे ही दाखवून दिले.
सोशल मीडियावर ज्ञान वाटणारे महाभाग
जॉगिंग मध्ये पकडलेले 50 महाभागां पैकी सुमारे 30 जण हे दिवसभर कोरोना ला रोखण्यासाठी सोशल मीडियावर वर ज्ञान वाटतात.मात्र लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी यांची अवस्था असल्याचे आज लक्षात आले.विशेष म्हणजे लहान मुलांना ही सोबत आणले होते
माजलगाव धरणावर रोज सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान 300 ते 400 लोक पोहण्यासाठी एकत्र येतात एकदा पी आय बुधवन्त यांनी तिकडे ही फेरफटका मारावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
Leave a comment