बीड । वार्ताहर
कापूस विक्रीसाठी शेतकर्यांनी पूर्व नोंदी केलेल्या असून असून कापूस मोजमापाचे कामकाज चालू असले तरी बीड बाजार समिती कार्यक्षेत्रातील कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावी अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून ऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे 28 एप्रिल रोजी करण्यात आली होती त्यानुसार कापूस खरेदी केंद्राला परवानगी मिळाली असल्याचे बाजार समितीचे सभापती दिनकर कदम यांनी कळवले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड या कार्यक्षेत्रात आठ कापूस खरेदी केंद्रांना मान्यता आहे. यासार जिनिंग नामलगाव, पार्वती जिनिंग नामलगाव, जय श्री गणेश जिनिंग नामलगाव, तुळजाभवानी जिनिंग बहिरवाडी,एन के इंडस्ट्रीज कुमशी फाटा, साई कॉन्टॅक्ट साखरे बोरगाव, नर्मदा देवी जिनिंग मैदा, गुरुकृपा फायबर घाटसावळी यापैकी तीन जिनिंग कार्यान्वित आहेत. परंतु ग्रेडरकडून कापूस जिनिंगवर दैनंदिन मोजमाप होत नाही त्यामुळे कापूस पणन महासंघाचे एका जिनिंगवर दररोज 20 आणि सीसीआयच्या एका जिनिंगवर 20 वाहनांचे मोजमाप होत आहे. ही मर्यादा शासनानेच घालून दिली होती तरीही संथगतीने सुरू असलेल्या मोजमाप यामुळे कापूस उत्पादक अडचणीत आला आहे ग्रेडचा कार्यप्रणाली मुळे शेतकरी त्रासून गेलाअसून कापूस माप न करता रिकवरीच्या नावाखाली जिनिंग चालक यांच्याकडून कवडी खराब कापूस म्हणून प्रतिक्विंटल दहा किलोची कपात कागदावर नोंद घेता करण्यात येत आहे. तसेच अर्धा कापूस आकारण्यात येत असून कापसाचे वाहन गेटच्या बाहेर काढण्यात येते. सध्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात 6371 शेतकर्यांच्या नोंदी विचारात घेऊन पावसाळ्यापूर्वीच सर्व कापसाचे मोजमाप पूर्ण करण्यासाठी आठ जिनिंग पूर्ण क्षमतेने चालू कराव्यात कापूस ग्रेडिंग वजनाच्या विषयी ग्रेडरच्या कार्यक्षेत्रात कपात करू देऊ नये,तसेच वाहनांची मर्यादा वाढवावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे करण्यात आली होती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी याबाबत जिल्हाधिकारी रेखावार यांच्याशी चर्चा करून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील तातडीने पत्र पाठवून कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी अशी विनंती केली होती; त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कापूस खरेदी केंद्राला मंजुरी दिली असल्याचे बाजार समितीचे सभापती दिनकर कदम यांनी कळविले आहे.
Leave a comment