आष्टी । वार्ताहर
आष्टी येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध वकील त्र्यंबक तथा बबनराव देशपांडे (वय 85 वर्षे) यांचे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आष्टी न्यायालयातील वकील अॅड. श्रीकृष्ण देशपांडे यांचे ते वडील होत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते आयुष्यभर सक्रिय सहभागी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमधील शासकीय नियमांचे पालन करून खंडोबा मंदिराजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
अॅड. बबनराव देशपांडे यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते,सोमदरा गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील पहिल्या गुरुकुलाची स्थापना करणारे,आष्टी तालुक्यात महाविद्यालयाच्या उभारणीतून शिक्षणाची दारे खुली करणारे आष्टी तालुका शिक्षण मंडळाचे सचिव म्हणून धुरा सांभाळणारे आष्टी येथील प्रसिद्ध विधिज्ञ अड.बबनराव देशपांडे ऊर्फ दादा यांचे गुरुवारी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यृसमयी त्यांचे वय 84 वर्षे इतके होते.
18 आगष्ट 1936 साली अॅड.बबनराव देशपांडे ऊर्फ दादाला यांचा जन्म झाला.शालेय शिक्षण आष्टीत झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अहमदनग नगर येथे तर उच्चशिक्षणासाठी पुणे येथील आयएलएसला महाविद्यालयात शिक्षण पुर्ण केले.संघकार्याचे बाळकडू असलेले दादा हे बडमिंटन व लाग टेनिस पुणे विद्यापीठाचे खेळाडू म्हणून नामांकीत होते. मुंबई उच्च न्यायालयात वकीलीची उमेदवारी त्यांनी केली.त्यानंतर अॅड.रामराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथे वकीली व्यवसायास सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.अनेक सामाजिक संस्था उभारणी करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला.पाटोदा तालूक्यातील दिनदयाळ शोध संस्था नवी दिल्लीच्या माध्यमातून त्यांनी सोमदरा गुरुकुलची स्थापना केली. जिल्ह्यातील पहिल्या गुरुकुलची स्थापना करुन संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी अखेरपर्यंत धुरा सांभाळली.सामाजिक,शैक्षणिक,व्या
वकीली व्यवसायात विशेष नावलौकिक मिळविलेले दादा होते.वित्तीय संस्था,कारखाना, राष्ट्रीय बका,बाजार समिती, राष्ट्रिय व सहकारी संस्थेचे कायदेविषयक मार्गदर्शक दादा होते.त्याच्या वकीली व्यवसायात त्यांनी ज्युनियर वकीलांसमोर आदर्श निर्माण केला होता.तालुका वकील संघाचे बिनविरोध अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. वकीली व्यवसायात ते वरिष्ठ वकील म्हणून सर्वांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी वकील संघातून विविध वकीलांनी मार्गदर्शन घेऊन न्यायाधीश पदा पर्यंत संधी प्राप्त केलेली आहे.दादांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून दादांच्या पश्चात मुलगा अड.श्रीकृष्ण देशपांडे तीन मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे
Leave a comment