माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ऊर्जा मंत्र्यांकडे मागणी
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील खरीप हंगामापूर्वी सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारा विद्युत दुरुस्ती व ट्रांसफार्मर वेळेवर उपलब्ध करून देऊन प्रि मान्सून मेंटेनन्स ची कामे त्वरित सुरू करावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे
बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी महावितरण द्वारा सार्वजनिक वितरण प्रणाली प्रि मान्सून मेंटेनेस ची कामे तातडीने सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर जळालेले आहे ते तातडीने दुरुस्त करून ठेवण्यात यावेत जेणेकरून खरीप हंगाम सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात ट्रांसफार्मर जळण्याचे प्रमाण वाढत असते व हे जळालेले ट्रान्सफार्मर वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते सध्या प्री मान्सूनची कामे संथगतीने होत असून त्यासाठी योग्य प्रमाणात विज साहित्य उपलब्ध होत नाहीत वाहतूक व वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्री मानसून मेंटेनन्स व ट्रांसफार्मर उपलब्धता करण्यात यावी तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने देण्यात याव्यात अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या पत्रात केली आहे
Leave a comment