आष्टी । वार्ताहर
लॉकडाऊन शिथिल असण्याच्या काळात विनामास्क फिरणाराकडून सुमारे पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे यांनी दिली.
कोरोना लॉकडाऊन काळात घराबाहेर पडू नका, पडल्यास तोंडाला मास्क असावा असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जाते. मात्र अनेकजण याचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. अशा लोकांकडून आष्टी नगर पंचायतने तीस हजाराचा दंड वसूल केला आहे. कडा ग्रामपंचायतने देखील वारंवार आवाहन करून ही लोक ऐकत नसल्याने बुधवार पासून दंड वसुलीस सुरवात केली. यावेळी सकाळी 7 ते साडेनऊ या वेळेत विनामास्क फिरणाराकडून चार हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी खिलारे यांनी दिली. यापुढेही अशी कारवाई चालूच राहणार असून मास्क न लावता फिरणारा बरोबर रस्त्यांवर थुंकणार्याकडून ही दंड वसूल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a comment