आष्टी । वार्ताहर
परजिल्ह्यातून येऊन कसल्याही प्रकारची सुचना न देता गावात येऊन राहिल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हाबंदी असताना आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे प्रशासनाला हुलकावणी देत तालुक्यात प्रवेश करुन कसल्याच प्रकारे आपण आल्याची सुचना न देता गावात गुपचुप पणे राहत असलेल्या तिघांविरुद्ध बुधवारी (दि.29)आष्टी पोलीसांनी तीन जणांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तालुक्यातील पारगाव येथे ग्रामसेवक बाप्पू जगताप यांच्या फिर्यादीवरुन गणेश कालीदास शिंगणे, हरुण मोहम्मद शेख, पांडूरंग केशव कदम (रा.पारगाव जोगेश्वरी) येथे राहत असल्याने या तीन जणांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती कायद्यांतर्गत कलम 188,269,270,51 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Leave a comment