प्रशासकीय यंत्रणाही सांगून सांगूण हतबल
किल्लेधारूर । वार्ताहर
शहरात बुधवारी संचारबंदी शिथिल वेळेत तुफान गर्दी होवून सोशल डिस्टंटींगची वाट लावत लोकांनी सहनशीलतेचा बांध फोडल्याचे दिसुन आले. काही दिवसांत प्रशासकीय यंत्रणाही कंटाळून गेल्याचे दिसत आहे. परंतू लोकांनीच आता पुढाकार घेवून घाई व अतिताईपणा टाळून व किमान सामाजिक अंतर पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या 38 दिवसांपासून लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्वंयस्फुर्तिने लॉकडाऊन पाळणारे लोकही आता सुस्तावले आहेत. सुरुवातीला जिवापाड धडपडणारी प्रशासकीय यंत्रणा सुध्दा थकली की काय असा प्रश्न पडला आहे. लोकांना शिस्त लावण्यासाठी स्थानिक नगर परिषद व पोलिस प्रशासनाने अतोनात प्रयत्न केली आहेत. जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शक सुचनानूसार येथील बाजार बंद करुन वेळोवेळी बदल करण्यात आले. मात्र आज या सर्व नियमांचा फज्जा उडवत व्यापारी व लोकांनी सहनशिलतेचा बांध सोडल्याचे दिसून आले. परंतु आजवर प्रशासनाला सहकार्य करणार्या जनतेने यापुढेही संयम ठेवून सामाजिक अंतर पाळणे गरजेचे झाले आहे
Leave a comment