किल्लेधारूर युथ क्लबची मागणी
किल्लेधारूर । वार्ताहार
किल्लेधारूर शहरांमध्ये निराधारांच्या पगारासाठी शासनाने योग्य ती पाऊल उचलून निराधारांच्या पगारी कराव्यात अशी मागणी किल्लेधारूरच्या सामाजिक संघटना युथ क्लब यांनी केली आहे.
कोरूना व्हायरल रोगामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत यामुळे निराधार लोकांची स्थिती अतिशय वाईट आहे व अशा लोकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे व शरीरामध्ये लहान-मोठे आजार साठी डॉक्टर कडे जाण्यासाठी आर्थिक टंचाई होत आहे तसेच लोकडाऊन मुळे हाताला काम ही नसल्यामुळे खूप आर्थिक अडचण होत आहे यामध्येच संजय गांधी व इतर योजनांच्या पगारही अडकले आहेत त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वृध्द व्यक्ती कोणी रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारामुळे ही त्रस्त आहेत . या सर्व व्यक्तीना आधार आहे तो शासनाच्या विविध योजनेचा आणि या विविध योजनेमधून मिळणारी रक्कम तीन, चार महिने झाले मिळाली नाही यामुळे त्यांना कामही नाही आणि शासकीय आधार ही नाही त्यामुळे अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहे याच मागणीसाठी सामाजिक संघटना युथ क्लब यांनी नायब तहसीलदार सुहास हजारे यांना लवकरात लवकर यांचा पगार काढावा अशी मागणी केली आहे. यावेळी युथ क्लबचे अध्यक्ष सुरेश शिनगारे अविनाश चिद्रवार अभयसिंह चव्हाण सूर्यकांत जगताप नितीन शुकला पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव देशमुख आदी सदस्य उपस्थित होते.
Leave a comment