आष्टी । वार्ताहर
राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढतच चाल्ला आहे.कोरोणाचा ससंर्ग फैलावु नये म्हणून गेल्या 21 तारखेपासुन जिवनाश्यक वस्तु सोडता संपुर्ण भारतामध्ये लाकडाऊन केलेले आहे.यामुळे जिल्ह्यासह सगळीकडेच हातावर पोट आसनार्या कुंटुबांवर उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे ज्या-त्या भागातील नेते कार्यकर्ते, प्रशासन हे मदतीचा हात पूढे करत आहेत. अशातच ईजिनियर प्रफुल्ल गोसावी यांनी आष्टी ,कडा शिराळ परीसरातील 200 कुंटुबांना किराणा साहीत्य वाटप केले आले.
कोरोणाचा प्रसार थांबवण्यासाठी नागरीक, सरकारने दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन करताना दिसत आहेत.हातावर पोट आसनार्या तसेच यामध्ये छोटे व्यावसायीकांलाही मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.मजुरांचा हातचा रोजगारही गेला आहे.कोरोणा साथीला रोखण्यासाठी गेल्या महिना भरापासुन लाकडाऊनमुळे गोरगरीब लोक खुप अडचणीत आले आहेत. अशा या संकटात सामाजिक बागोसावी जपत ईजिनियर प्रफुल्ल गोसावी यांच्या नेतृत्वाखाली आष्टी शिराळ परीसरातील 200 कुंटुबांना किराणा साहित्य वाटप केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत या भागातील गरंजुना आत्ताच खरी गरज आसल्याचे ओळखुन किराणा साहित्य वाटप केल्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या बद्दल आस्था निर्माण होऊ लागली आहे. या किराणा वाटपाबरोबर त्यांनी कोठलीही आपल्या राजकीय स्वार्थभाव नसताना एक सामाजिक बांधिलकी सेवाभाव या भावनेतुन पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव यांना देखील चांगल्या प्रतीचे 95, मास, त्याच बरोबर पोलीस कर्मचार्यांना कोरोना विषाणूचा पार्दुभाव होऊ नये म्हणून कोव्हीड बचाव कीट, सॅनिटायजरचे देखील वाटप केलेले आहे. हे ईजिनियर गोसावी परदेशात नौकरी करातात केवळ देशप्रेम व गावाच्या लोकांविषयी असलेली आस्था यामधुनच त्याचे हे समाज कार्य घडत आहे. त्याच्या या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
Leave a comment