बीड । वार्ताहर
कोरोना विषाणू संदर्भाने कोणत्याही बाबींवरील अफवा पसविणार्यांवर सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून बीड जिल्हा पोलीस दल करडी नजर ठेवून आले. बीडमध्ये सोशल मीडियातून अफवा पसरविल्या प्रकरणी व्हाट्सअप ग्रुप अॅडमिनसह तिघांविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला. या तिघांनाही पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
फेसबुकवरून जाणीवपूर्वक मीडिया आणि प्रशासन यांच्याविरोधात द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने एका पोस्ट केल्याप्रकरणी शेख समीर शेख सत्तार (24,रा.बीड) याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी (दि.28) पो.ना.राहुल गुरखुदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली. दरम्यान बुधवारी याच फेसबुक अकाऊंटवरून सदरील पोस्ट सय्यद खय्युम सय्यद जमीर याने दुसर्या एका व्हाट्सएप ग्रुपवर पोस्ट केली .त्यामुळे सदरील पोस्ट करणारा व त्या ग्रुपचा अॅडमिन सलीम जावेद शेरखान (30, रा.बीड) याने सदरची पोस्ट करण्यास ग्रुप अडमिन म्हणून संमती दिलेली आहे. म्हणून दोघांनाही या गुन्ह्यात आरोपी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असुन पुढील तपास सहाय्यक निरीक्षक के.बी.भारती हे करीत आहेत. दरम्यान अफवा पसरविल्या प्रकरणी बीड जिल्ह्यात 20 मार्चपासून आतापर्यंत 34 आरोपींविरुद्ध वेगवेगळे 32 गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Leave a comment