वाळूचा टेम्पो सोडण्यासाठी मागितली पंधरा हजारांची लाच
नेकनूर । वार्ताहर
नेकनूर हद्दीत वाळूचा टेम्पो सोडण्यासाठी 15 हजाराची लाच मागितल्याच्या प्रकरणात नेकनूर पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे याच्यासह पोहेकॉ. तांदळे या पोलिस कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. बुधवारी (दि.29) सायंकाळी नेकनूरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही वाळुची तस्करी जोरात आहे.सर्वत्र लॉकडाऊन असल्याचा फायदा उठवत वाळु तस्करांना मोकळे रान मिळाल्याचे चित्र असतानाच मिळत आहे. नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आलेला वाळूचा एक ट्रॅक्टर सोडण्यासाठी 15 हजाराची लाच मागण्यात आली. या प्रकरणात नेकनूर पोलिस ठाण्याचा सहाय्यक निरीक्षक सचिन पुंडगे व पोहेकॉ. तांदळे या दोघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. एसीबीचे पोलिस उपाधिक्षक हनपुडे पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.या कारवाईने खळबळ उडाली. दरम्यान रात्री उशीरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Leave a comment